प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयातील वरि÷ अधिकाऱयाला आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यालयात भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच कार्यालय आवारात वास्तव्यास असलेल्या क्वॉर्टर्समधील कुटुंबातील सदस्य भयभीत झाले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयातील अधिकाऱयांसह त्यांच्या कुटुंबीयाच्या कोरोना चाचणीकरिता स्वॅब घेण्यात आले.
महापालिकेपाठोपाठ कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापूर्वी प्रथम कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कंटेन्मेट झोन निर्माण करून कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व रस्ते पंधरा दिवसांकरिता बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रसार सर्वत्र झाल्याने कंटेन्मेट झोन करण्याचे मागे घेण्यात आले होते. पण दुसऱया टप्प्यात शहरातील विविध नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून कॅन्टोन्मेंट कार्यालयातील अधिकाऱयाला व कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने कार्यालयातील कर्मचाऱयांसह परिसरातील क्वॉर्टर्समधील रहिवाशांमध्ये भिती पसरली आहे. कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या मागील बाजूस अधिकाऱयांचे क्वार्टर्स आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. कार्यालयातील कर्मचाऱयाला लागण झाल्याची माहिती मिळताच कार्यालयात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱयांची व कुटुंबीयाची कोरोना चाचणी करण्याची विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे करण्यात आली होती.
त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वतीने कर्मचाऱयांची व कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा शुक्रवारी कार्यालय आवारात करण्यात आली होती. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयाशेजारी कर्मचाऱयांचे व कुटुंबीयाचे स्वॅब घेण्यात आले. कोरोना चाचणी घेण्याची सक्ती सर्वांना करण्यात आली होती. त्यामुळे अधिकाऱयांनी चाचणीकरिता सहकार्य केले. कोरोना चाचणीकरिता गर्दी झाली होती. पण सामाजिक अंतर राखून सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता स्वॅब अहवालाकडे लागले आहे.