प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट निवडणूक होण्यास विलंब असल्याने अधिकारी आणि नागरिकांतून एका सरकारनियुक्त सदस्याचा समावेश प्रशासकीय कारभारात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सुधीर तुपेकर यांची नियुक्ती केली आहे. शनिवारी आयोजित केलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत रितसर शपथ घेवून कार्यभार स्वीकारला.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत जुलैमध्ये संपली आहे. सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून निवडणुकीबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. लोकनियुक्त सभागृहाला दोनवेळा प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे तिसऱयांदा मुदतवाढ देण्यात आली नाही. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे आणि कॅन्टोन्मेंट कायद्यात नव्या तरतुदीमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डवर अध्यक्ष म्हणून कमांडंट अधिकाऱयांची आणि सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या मांडण्याकरिता नागरिकांमधून एका प्रतिनिधीची निवड करण्याचा आदेश संरक्षण खात्याने बजावला होता. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डकरिता सुधीर तुपेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचना नोक्हेंबर महिन्यात जारी करण्यात आलीं होती. मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सरकार नियुक्त सदस्य म्हणून सुधीर तुपेकर यांनी शपथ घेवून कार्यभार स्वीकारला.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके व अधिकारी उपस्थित होते.