प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने कर्मचाऱयांना वेतन देणे कठीण बनले आहे. काही सरकारी इमारतीचा सर्व्हिस शुल्क येणे बाकी आहे. पोस्ट कार्यालयाने सर्व्हिस शुल्क भरला नसल्याने अडीच कोटीच्या घरात थकबाकी आहे. सदर रक्कम भरण्याच्यादृष्टीने पोस्ट खात्याच्या अधिकाऱयांनी सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद यांची भेट घेऊन चर्चा केली.
केंद्र आणि राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला अनुदान देण्यात आला नाही. परिणामी पाणी बिल, विद्युत बिल थकले असून ही रक्कम पाच कोटीच्या घरात पोहचली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने अर्थिक स्थिती बिकट बनली आहे. तसेच शासनाकडूनदेखील अनुदान देण्यात आले नसल्याने विकासकामे राबविण्यासह कर्मचाऱयांचे वेतन देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅन्टोन्मेंटचा कारभार चालविताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही मालमत्ताधारकांनी करभरणा केली नाही. तर काही सरकारी इमारतीचा सर्व्हिस शुल्क येणे बाकी आहे. त्यामुळे सर्व्हिस शुल्क वसूल करण्याच्यादृष्टीने कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रयत्न केला होता, पण यश आले नाही.
पोस्ट खात्याच्या इमारतीचा सर्व्हिस शुल्क भरणा करण्यात आला नसल्याने ही रक्कम अडीच कोटीच्या घरात पोहचली आहे. सदर रक्कम भरण्याच्यादृष्टीने यापूर्वीदेखील बैठका झाल्या होत्या. पण रकमेचा आकडा जास्त असल्याने कमी करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने पोस्ट खात्याच्या सर्व्हिस शुल्क भरण्याचा मुद्दा रखडला होता. पोस्ट खात्याच्या अधिकाऱयांनी सोमवारी पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांची भेट घेतली. तसेच सर्व्हिस शुल्क भरण्याची तयारी दर्शवून रक्कम कमी करण्याबाबत विनंती केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कायद्यानुसार निश्चित केलेली रक्कम भरणे बंधनकारक आहे.