नवी दिल्ली
देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱयांना या आठवडय़ात केंद्र सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते. गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएच्या थकबाकीवर या आठवडय़ात निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱयांच्या डीएच्या थकबाकीबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिल्याचे समजते. आगामी बैठकीत केंद्र सरकारने रखडलेल्या डीएबाबत निर्णय घेतल्यास कर्मचाऱयांच्या पगारात वाढ होण्यासोबत त्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते. गेल्या दीड वर्षांपासूनच ही रक्कम असून ‘वन टाईम सेटलमेंट’ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱयांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. तथापि, टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्याचा निर्णय झाल्यास कमी रक्कम खात्यात पडेल.