वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स रिटेलमधील काही प्रमाणातील हिस्सेदारी विक्रीस काढली आहे. याअंतर्गत सात कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये केकेआरने गुंतवणूकीची घोषणा केली होती. याचाच एक भाग म्हणून सध्या प्रायव्हेट इक्विटी फर्म केकेआरने रिलायन्सला 5550 कोटी रुपयांचा धनादेश नुकताच प्रत्यक्ष भेटून दिलेला आहे. 23 सप्टेंबर रोजी रिलायन्समधील 1.28 टक्के हिस्सेदारी केकेआरने विकत घेण्याची घोषणा केली होती. रिलायन्समध्ये केकेआरने ही दुसरी गुंतवणूक केलेली आहे. या अगोदर रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.32 टक्क्यांची हिस्सेदारी विकत घेण्यासाठी जवळपास 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.