न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन भारताविरुद्ध पहिल्या दोन वनडेत खेळू शकणार नाही, असे मंगळवारी स्पष्ट झाले. पहिल्या दोन वनडेनंतर विल्यम्सन तिसऱया व शेवटच्या वनडेत खेळणार का, हे नंतरच जाहीर केले जाईल. विल्यम्सनच्या गैरहजेरीत टॉम लॅथम हंगामी कर्णधाराच्या भूमिकेत असेल.
सेडॉन पार्कवर भारताविरुद्ध तिसऱया टी-20 सामन्यादरम्यान विल्यम्सनला दुखापत झाली होती. त्यानंतर उर्वरित दोन टी-20 सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. विल्यम्सन दुखापतग्रस्त असल्याने डावखुरा फलंदाज मार्क चॅपमनला किवीज संघात पाचारण केले गेले आहे.