वार्ताहर/ केपे
नवयुग विकास मंच, केपे यांनी आयोजित केलेल्या अखिल गोवा नरकासुर वध स्पर्धेत पुरुषम्हारू कला मंडळ, खामामळ-कुडचडे यांना प्रथम बक्षीस तर केपे मतदारसंघ मर्यादित नरकासुर स्पर्धेत श्री चंदेश्वर भूतनाथ कटेकर युवक मंडळ, कट्टा-आमोणा यांना प्रथम बक्षीस प्राप्त झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, चेतन हळदणकर, प्रसाद फळदेसाई, दिपाली वेळीप, जि. पं. सदस्य संजना वेळीप, शाणू वेळीप, सरपंच जेन्सिता डायस, सिद्धेश शेटकर, वॉल्टर मिनेझिस, सचिन शेटकर, हरिश कोमरपंत, केतन बिर्जे, तुकाराम चौधरी व इतर उपस्थित होते.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – अखिल गोवा नरकासुर वध स्पर्धा – प्रथम पुरुषम्हारू कला मंडळ, द्वितीय नागेशी यूथ क्लब, नागेशी, तृतीय पंटेमळ युवा मंच, कुडचडे, चौथे कानडीपुरुष युवक, सांगे, पाचवे देवतेवाडा-कुडचडे, उत्तेजनार्थ-युवा दि सातेरी शेळवण, रामपुरुष मंडळ, ओंकार हौशी मंडळ, सन्मित्र ताकाबांद, आडपई यूथ. उत्कृष्ट संगीत-ओंकार हौशी मंडळ, उत्कृष्ट रथ व कृष्ण-पुरुषम्हारू मंडळ, कुडचडे.
केपे मतदारसंघ मर्यादित वरिष्ठ गट – प्रथम श्री चंदेश्वर भूतनाथ कटेकर युवक मंडळ, द्वितीय आमोणा बॉईज, तृतीय यूथ ऑफ फातर्पा, चौथे कुंभारवाडा-शिरवई, पाचवे कोठंबी तर उत्तेजनार्थ-बाळ्ळी कटय़ार, केपे एस. क्लब, देसाईवाडा. कनिष्ठ गट – प्रथम वाठारेश्वर युवक मंडळ, पाडादेग, द्वितीय ब्रह्मदेव बॉईज, तृतीय देऊळमळ स्पोर्ट्स क्लब, उत्तेजनार्थ – रेड बॉईज, विसी बॉईज, चंद्रेश्वर वॉरियर्स, कटेकर बालमंडळ, फनी यो, सप्तकोटिश्वर, यंग बॉईज ऑफ देऊळमळ.
अखिल गोवा वेषभूषा स्पर्धा – प्रथम प्रज्योत पर्वतकर, द्वितीय सिर्धी फळदेसाई, तृतीय सौम्या फळदेसाई, उत्तेजनार्थ – शयंक आडपईकर, अनोखी नंदार, अन्या सहकारी. केपे मतदारसंघ मर्यादित वेषभूषा स्पर्धा – प्रथम सिर्धी फळदेसाई, द्वितीय सोम्या फळदेसाई, तृतीय दित्या शिरवईकर, उत्तेजनार्थ – साईदिशा फळदेसाई, विमलेश शेटगावकर, गुनीत रायकर. सूत्रसंचालन संदीप फळदेसाई यांनी केले तर स्वागत सिद्धेश शेटकर यांनी केले. वॉल्टर मिनेझिस यांनी आभार मानले.