शरीरावर आढळल्या गंभीर जखमा, पाच दिवसांचे उपचार ठरले निष्फळ
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यु झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याच्यावर वायनाड येथील उपचार केंद्रातील पशूवैद्यकीय अधिकाऱयांकडून उपचार सुरु होते. परंतु शरीरावरील गंभीर जखमांचा दुष्परिणाम झाल्याने या हत्तीचा मृत्यु झाल्याचे पशूवैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.
केरळमधील उत्तर निलाम्बुर जिल्हय़ातील वनक्षेत्रात ही घटना घडली आहे. हत्ती गंभीर अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पशूचिकित्सक घटनास्थळी दाखल होऊन त्याला उपचार केंद्रात नेले. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. तथापि त्याचा उपयोग झाला नाही.
एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार काही लोकांनी या हत्तीबाबत वनविभागाला माहिती दिली. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून आल्या. तथापि अन्य हत्तीबरोबर झालेल्या लढाईचा परिणाम असावा असे या अधिकाऱयाने म्हटले आहे.वायनाडहून विशेष पथक बोलवण्यात आले होते. परंतु हत्तीला वाचू शकले नाहीत. शवविच्छेदन केल्यानंतर या हत्तीवर अग्नीसंस्कार करण्यात आले.
गेल्या 15 दिवसांतील हत्तीचा मृत्यु गंभीर पद्धतीने होण्याची ही दुसरी वेळ आहे. पल्लकड जिल्हय़ातील वनक्षेत्रात 27 मे रोजी तोंडात फटाके फुटल्याने एका हत्तीचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आल्याची माहिती वनमंत्री के. राजू यांनी दिली होती. तर या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच दुसऱया हत्तीचा मृत्यु झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.