ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याने 14 जिल्ह्यातील रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास केरळ सरकारने परवानगी दिली आहे. तसेच खासगी वाहनांनाही ऑड-इव्हन नियमाप्रमाणे परवानगी देण्यात येणार आहे.
केरळमध्ये मागील आठवड्यात कोरोनाग्रस्तांची एक अंकी वाढ झाली. तसेच कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्याही झपाट्याने वाढली आहे. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 396 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 255 लोक बरे झाले आहेत. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केरळमधील कोरोना नियंत्रणात आल्याने केरळ सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर रेड झोन वगळता ऑरेंज ए, ऑरेंज बी आणि ग्रीन झोनमधील प्रतिबंध हटवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. केंद्र सरकारनेही केरळ सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे रेड झोन वगळता इतर 14 जिल्ह्यातील प्रतिबंध हळूहळू उठविण्यात येणार आहेत.