केरळहून आलेल्या दोन वर्षीय बालिकेला कोरोना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्यातील आणखी चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये केरळहून जिह्यात आलेल्या दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. राज्य आरोग्य विभागाने बुधवारी दुपारी जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 139 वर पोहोचली आहे.
केरळहून आलेली दोन वर्षीय बालिका महाराष्ट्रातून आलेले 32 वषीय युवक व 37 वषीय महिला दिल्लीहून बेळगावला परतलेल्या 28 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी दुपारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये राज्यातील 122 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या 2405 वर पोहोचली आहे.
सम्मेदशिखरजीहून जिह्यात परतलेल्या 13 भाविकांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर लगेच दुसऱया दिवशी आणखी चौघा जणांना कोरोनाची लागण झाली असून प्रशासनाला 1500 हून अधिक अहवालांची प्रतिक्षा आहे. त्यामध्ये खास करुन मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा भागातून आलेल्यांची संख्या अधिक आहे.