धामोड / वार्ताहर
केळोशी बु॥ ता. राधानगरी येथील अक्षय सुरेश पाटील याने जयपूर येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया युथ गेम्स चॅम्पीयनशीप कबड्डी स्पर्धत सुवर्णपदक पटकाविले.
कोलंबो श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युथ गेम्स कब्बड्डी स्पर्धसाठी हिंदुस्थानी संघात त्याची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय संघात निवड होणारा राधानगरी तालुक्यातील तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याला प्रशिक्षक दिनकर मस्कर, वडील सुरेश पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. दरम्यान त्याच्या या यशाबद्दल अष्टविनायक तरुण मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने त्याचा शाल, फेटा , बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.