मनपाच्या विविध कार्यालयांमध्ये सोय : पाच टक्के सवलतीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टी भरणाऱयांना पाच टक्के सवलतीचा लाभ मिळण्यासाठी दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊन केल्याने बेळगाव-वनसह मनपा कार्यालयात घरपट्टी भरून घेण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ स्वाईप मशीनद्वारा घरपट्टी भरून घेण्यासाठी विविध कार्यालयात सोय केली असून मोबाईल क्रमांक आणि एटीएम कार्डद्वारा घरपट्टी भरता येणार आहे.
कोरोनाचा प्रसार वाढल्याने देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येते. पण यंदा लोकसभा पोटनिवडणूक आणि त्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढल्याने मालमत्ताधारकांना घरपट्टी भरता आली नाही. त्यामुळे मुदतवाढीची मागणी केल्याने याबाबत शासनाने विचार करून मालमत्ताधारकांना दि. 30 जूनपर्यंत 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ केली असल्याने लाभ मिळणार आहे. यापूर्वी कर भरणा केला नसल्यास दि. 30 जूनपर्यंत मालमत्ता कर भरणा करून लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. पण राज्यात लॉकडाऊन केल्याने शहरातील बेळगाव-वन कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
ऑनलाईन, पेटीएम आणि स्वाईप मशीनद्वारा तसेच शहरातील बेळगाव-वन कार्यालयात घरपट्टी भरण्याची सुविधा आहे. पण लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व बेळगाव-वन कार्यालये बंद आहेत. ज्यांना ऑनलाईन घरपट्टी भरणे शक्मय आहे, त्या मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 13 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. पण महापालिकेने यंदा 50 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे घरपट्टी घेणे अडचणीचे बनले आहे. पाच टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक घरपट्टी जमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण बेळगाव-वन कार्यालय बंद असल्याने घरपट्टी कुठे जमा करायची असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याची दखल घेतली असून मनपा कार्यालयात स्वाईप मशीनद्वारा घरपट्टी जमा करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिसालदार गल्ली, गोवावेस व्यापारी संकुल, कोनवाळ गल्ली, अशोकनगर अशा विविध उपविभागीय कार्यालयात घरपट्टी जमा करण्यात येणार आहे. घरपट्टी जमा करताना अडचण आल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधाण्याचे आवाहन मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे.
संपर्कासाठी आवाहन
वॉर्ड क्रमांक | कार्यालय | संपर्क क्रमांक |
1 ते 7 | मनपा व्यापारी संकुल, गोवावेस कार्यालय | 9845891518 |
8 ते 14 | मनपा व्यापारी संकुल, गोवावेस कार्यालय | 9900775501 |
15 ते 20 | मनपा व्यापारी संकुल, गोवावेस कार्यालय | 8970608009 |
21 ते 26 | मनपा व्यापारी संकुल, गोवावेस कार्यालय | 9686799275 |
27 ते 32 | मनपा कार्यालय, रिसालदार गल्ली | 8050133461 |
33 ते 39 | मनपा गेस्ट हाऊस, कोनवाळ गल्ली | 9731867888 |
40 ते 45 | मनपा गेस्ट हाऊस, कोनवाळ गल्ली | 8147855514 |
46 ते 52 | मनपा कार्यालय, अशोकनगर | 9731062872 |
53 ते 58 | मनपा कार्यालय, अशोकनगर | 9902686126 |