प्रतिनिधी /वास्को
केशव स्मृती हायस्कुलचे अध्यक्ष पांडुरंग कोरगांवकर यांचा 60 व्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वा. आल्त दाबोळी येथील केशव स्मृती हायस्कुलच्या आवारात सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
केशव स्मृती परिवारातर्फे आयोजित केलेल्या या सत्कार सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याप्रबोदिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष वेलींगकर उपस्थित असतील. त्यांच्याचहस्ते पांडुरंग कोरगांवकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण विभागाचे माजी संचालक गजानन भट, गोवा शालांत मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, शिक्षण विभागाचे माजी संचालक संतोष आमोणकर, गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भागिरथ शेटय़े, निवृत्त शिक्षक विष्णू कुंभार, निवृत्त शिक्षक प्रमोद गणपुले व निवृत्त शिक्षक रजनीकांत गावडे उपस्थित असतील.