फिनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
युनियन जिमगाना आयोजित फिनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या क्वालीफायर सामन्यात के. आर शेट्टी संघाने बीसीसी मच्छे संघाचा 8 गडय़ानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर इलिमिनेटर सामन्यात विश्रुत स्ट्रायकर संघाने ऍडव्होकेट पाटील लायन संघाचा 2 कडय़ाने मात करून क्वालीफायर फेरीत प्रवेश केला आहे. प्रशांत लायंदर (के. आर. शेट्टी), नरेंद्र मांगोरे (विश्रुत स्ट्रायकर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या क्वॉलिफायर सामन्यात बीसीसी मच्छे संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडी बाद 133 धावा केल्या. त्यात संदीप चव्हाणने 2 षटकार, 2 चौकारासह 31, सुनिल फायडूने 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, अमित पाटीलने 3 चौकारासह 16, आनंद करडीने 14 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे नाशिर पठाणने 24 धावात 3, भरत गाडेकरने 19 धावात 2, अनंत माळीने 21 धावात 2, अलिम माडीवालेने 25 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 16.4 षटकात 2 गडी बाद 134 धावा करून सामना 8 गडय़ाने जिंकला. त्यात कर्णधार प्रशांत लायंदरने 1 षटकार 8 चौकारासह 71, गिरीश नाडकर्णीने 2 चौकारासह 31 धावा केल्या. बीसीसी तर्फे मनोज ताशिलदारने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात ऍडव्होकेट पाटील लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 137 धावा केल्या. त्यात विशाल गौरगोंडाने 4 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 74, सुनिल सक्रीने 1 षटकार आणि 3 चौकारासह 39 धावा केल्या. विश्रुततर्फे नरेंद्र मांगोरेने 17 धावात 3 तर प्रमोद पालेकर व हनिफ शाबाजखान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर संघाने 20 षटकात 8 गडी बाद 138 धावा करून सामना दोन गडय़ांनी जिंकला. त्यात नरेंद्र मांगुरेने 7 चौकारासह 50, प्रमोद पालेकरने 3 चौकारासह 29, कलीम पठाणने 18 तर, हनिफ शाबाजखानने नाबाद 17 धावा केल्या. ऍडव्होकेट पाटील लायन्स तर्फे विशाल गौरगोंडाने 33 धावात 2 मदन बेळगावकरने 36 धावात 2, एन. बी. पाटील व सुनिल पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर पुरस्कर्ते हर्ष जॉन थॉमस, जगजीत मदन डोंगरे यांच्या हस्ते सामनावीर प्रशांत लायंदर, इम्पॅक्ट खेळाडू नासीर पठाण, उत्कृ÷ झेल अमृत बिरोडकर, सर्वाधिक षटकार संदीप चव्हाण तर दुसऱया सामन्यात बाळकृष्ण पाटील, लक्ष्मण पाटील व सागर हावळण्णाचे यांच्याहस्ते सामनावीर नरेंद्र मांगुरे, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार विशाल गौरगोंडा, उत्कृ÷ झेल सुनिल सक्री यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
रविवारी दुसरा क्वालिफायर सामना बीसीसी मच्छे वि. विश्रुत स्ट्रायकर्स यांच्यात सकाळी 9 वा. होणार आहे.