पहिल्या तिमाहीतील कामगिरी : निव्वळ नफा 1,672.41 कोटींवर
वृत्तसंस्था/ मुंबई
कॅफे कॉफी डे चालविणारी कंपनी कॉफी डे एंटरप्राईझेस लिमिटेडला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या कालावधीत महसूलातून 90 टक्क्मयांपेक्षा अधिक म्हणजे 1,672.41 कोटी इतका निव्वळ लाभ झाला आहे. परंतु यावेळी नफा प्राप्ती कंपनीमधील हिस्सेदारी विकण्याच्या कारणामुळे झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील वर्षात कंपनीने माइंडट्रीमध्ये आपली हिस्सेदारी विकली आहे. कंपनीच्या महसूलात यावेळी 4 टक्क्मयांची घसरण झाली आहे. तसेच कंपनीचा एकूण खर्च 15 टक्क्मयांनी वधारुन 1,128.57 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एक वर्षाअगोदर समान कालावधीत हा खर्च 981 कोटी रुपये होता.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2021च्या पहिल्या तिमाहीत कंपनीमध्ये आणि माइंडट्रीमधील समभागाच्या झालेल्या विक्रीमुळे एकूण महसूल 1,941.95 कोटी रुपये राहिला होता तर यामध्ये ग्लोबल एज सॉफ्टवेअरच्या समभागांच्या विक्रीने 23 कोटीचा तोटाही झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.
महसूल कमाई
कॉफी आणि त्याच्याशी संबंधीत असणाऱया व्यवसायामुळे कंपनीचा महसूल 442.57 कोटी रुपयांवर पोहचला आहे. हा आकडा आर्थिक वर्ष 2020 च्या पहिल्या तिमाहीत 471.85 कोटी रुपयांच्या तुलनेत 6 टक्क्मयांपेक्षा कमी राहिला आहे.