वार्ताहर /कंग्राळी बुद्रूक
बेळगाव येथील कॉम्बॅट मार्शल आर्ट्स अँड सुपर कराटे संघाच्या कराटेपटूंनी तेलंगणा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
तेलंगणा येथील सरनूर इनडोअर स्टेडियममध्ये सदर स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये संदीप राठोड, सलमान निझामी, शरण राठोड, स्नेहल घेवरी, अरबाज नदाफ, फहाद शेख, मनन सुभेदार, तेजस सपकाळ, योगेश एम., आदिनाथ गावडे, ऋषीकेश मन्नोळकर आदींनी सुवर्णपदक मिळविले तर फैजान शेख, पांडुरंग, आदिनाथ जी., आर. एन. तलवार यांनी रौप्यपदक
मिळविले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा कटामध्येही यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये आर. एन. तलवार, ऋषीकेश मन्नोळकर, तेजस सपकाळ, आदिनाथ गावडे, अरबाज नदाफ यांनी सुवर्णपदके मिळविली. याच स्पर्धेत सलमान निझामी, संदीप राठोड, फहाद शेख, स्नेहल घेवारी यांनी रौप्यपदके मिळविली. कांस्यपदक मिळविलेले कराटेपटू-शरण राठोड, योगेश एम., आदिनाथ गावडे, पांडुरंग.
वरील सर्व कराटेपटूंना ग्रँड प्रशिक्षक महेंद्र एस. एम., मास्टर प्रणय महिंद्रकर, महिला मास्टर सुनीता महिंद्रकर, प्रज्ञा महिंद्रकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.