वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज बेव्हरेज कंपनी कोका-कोला कंपनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेत 1200 कर्मचाऱयांच्या समावेशासह कंपनी कार्यरत असून कोरोनानंतर प्रथमच कंपनी 2021 मध्ये बाजारात नवीन तयारीशी उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये नव्या पूनर्रचित धोरणाच्या अंतर्गत 2,200 जणांची कपात करण्याचे संकेत आहेत.
या अगोदर कंपनीने उत्तर अमेरिकेत आपल्या 40 टक्के कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखविलेला आहे. तसेच आगामी काळातही कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. आगामी काही महिन्यांमध्ये ही कपात होण्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे चालू वर्षात विक्रीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे समजते. या कारणामुळेच हा निर्णय घेत असल्याचे कोका-कोलाने स्पष्ट केले आहे. कंपनी जागतिक पातळीवर जवळपास 2.6 टक्क्यांची कर्मचारी कपात करणार आहे.