मुंबई
गृहकर्ज व्याजदर घटवण्याचा सिलसिला सुरू झाला असून या स्पर्धेत आता कोटक महिंद्रा बँकेने आपला व्याजदर कमी केला आहे. बँकेने गृहकर्जाचा व्याजदर 6.65 टक्के इतका ठेवला असून 31 मार्चपर्यंत या दराचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला व्याजदर घटवला होता. एकंदरच गृहकर्ज वितरणाच्या क्षेत्रामध्ये आता बँका येणाऱया काळात कमीतकमी व्याजदर आकारण्यासाठी स्पर्धा करतील हे स्पष्ट होत आहे. महिंद्रा बँकेने गृहकर्जाचे व्याजदर 10 बेसिस पॉईंटने कमी केले आहे.