ऑनलाईन टीम / कोटा :
लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेले विविध राज्यातील 7500 विद्यार्थी आता घरी परतणार आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोटा शहरात उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडसह देशभरातील इतर राज्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग विषयांच्या कोचिंगसाठी येत असतात. तिथे 7500 विद्यार्थी 25 मार्चपासून येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी घरी परतण्यासाठी सोशल मीडियावर एक अभियानही सुरू केले होते. या अभियानाची दखल घेत योगी सरकारने आज (शनिवार) आणि उद्या (रविवार ) अशा दोन दिवसांत हे विद्यार्थी घरी परत आणण्याचा निर्णय घेतला.