20 चौकांवर ओव्हरब्रिज, अंडरपासची निर्मिती
शैक्षणिक केंद्र कोटा आता उत्तम शहर नियोजनाचे उदाहरण ठरणार आहे. 20 चौक असलेल्या या शहराला पूर्णपणे ट्रफिक सिग्नलमुक्त करण्याची तयारी सुरू आहे. याकरता अंडरपास (भूमिगत मार्ग) आणि ओव्हरब्रिजची योजना आहे. ही योजना साकार झाल्यास भूतानची राजधानी थिम्पूनंतर कोटा हे सिग्नलरहित असलेले जगातील दुसरे शहर ठरणार आहे.
याचबरोबर वाराणसीच्या धर्तीवर चंबळच्या दोन्ही काठांवर 3 किलोमीटरच्या कक्षेत हेरिटेज रिव्हर प्रंट निर्माण केला जातोय. तेथे 30 घाट निर्माण केले जात असून सरकार या प्रकल्पावर 700 कोटी रुपयांचा खर्च करत आहे. रिव्हरप्रंटमध्ये क्रूज चालणार असून मुलांसाठी वॉटरपार्कही असेल. 12 देशांचे फूड स्ट्रीट, हस्तकला बाजार आणि सुंदर उद्यानेही असतील. पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर राइड उपलब्ध करण्यात येणार आहे. रिव्हरप्रंटच्या काठावर माता चर्मण्यवतींचा 40 फुटी पुतळा उभारण्यात येणार