तिनिधी / वारणानगर :
चक्क कोडोलीत फुलले ‘दोन रंगी कमळ’. गणेश पार्क, कोडोली ता. पन्हाळा येथील प्रकाश मोरे यांच्या अंगणातील वेलास गडद गुलाबी – फिकट गुलाबी अशा दोन रंगात बहरलेले कमळ पाहण्यास नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
कोल्हापूर स्टील मधून सेवानिवृत्त झालेले प्रकाश मोरे यांनी बागेची आवड असल्याने अंगणात निवडक झाडांची रोपं, वेलं लावले आहेत. कमळाच्या वेलाचे त्यांनी अंगणात तीन वर्षांपूर्वी लागवड केली होती. त्यास प्रामुख्यांने फिक्कट गुलाबी रंगाचे कमळाचे फूल येत होते.
परंतु यावर्षी हे कमळ गुलाबी रंगाच्या गडद आणि फिक्कट अशा दोन छटांनध्ये अर्ध्या आकारात फुलले आहे. कमळाच्या मध्यभागापासून हे दोन रंग वेगवेगळे दिसत आहेत. निसर्गाची ही नवलाई पाहण्यास नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत.