प्रतिनिधी /वारणानगर :
कोडोली ता. पन्हाळा येथील राज्य मार्गावरील एमएसईबी फाटयावरून सांगली जिल्ह्यातील करंजवडे ता. वाळवा येथील सुवर्णा कृष्णात पुजारी, वय ३० ही आई आपला मुलगा सोहम, वय ६ याच्यासह शनिवार दि. १८ रोजी दुपारी २ वा. बेपत्ता झाली आहे. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात वडील हैबती बापु एडके यांनी वर्दी दिली आहे.
घरकाम करणारी सुवर्णा हीचे ७ वी शिक्षण झाले असून अंगाने मजबुत, रंगाने गोरी, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, डोकीस काळे केस, उंची ५ फुट १ इंच, अंगात नेसलेली जांभळ्या कलरची साडी, व ब्लाऊज, मराठी भाषा बोलते असे वर्णन आहे. तर मुलगा सोहम हा इयत्ता पहिलीत शिकत असून रंगाने गोरा, नाक सरळ, डोळे काळे उंची साधारण ३ फुट, अंगात लाल कलरचा टी शर्ट, काळ्या कलरची पॅन्ट, मराठी भाषा बोलतो असे वर्णन आहे.
सुवर्णा हीचे सासर वाशी असून पतीचे निधन झाल्याने ती वडिलांकडे रहात होती. शनिवारी ती पोखले ता. पन्हाळा येथील बहिणीकडे आली होती. ती माहेरी करंजवडे येथे जाते असे सांगुन घरातुन दुपारी बाहेर पडली असून कोडोली येथुन ती बेपत्ता झाली आहे. ती माहेरी न जाता कोठेतरी निघुन गेली असुन तिचा व मुलगा सोहम याचा शोध घेतला असता ती अदयाप घरी परत न आल्याने वडील हैबती बापु एडके यांनी तक्रार केली असून, याचा तपास पो. ना. शशीकांत पाटील करीत आहेत.