मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर आता मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नावडतीचं मीठ अळणी असं म्हणत कोण अमृता फडणवीस? असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. तसंच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळलाय. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, अशंही पेडणेकर म्हणाल्या. लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.
अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये एकमेकांची पाठ खाजवणं सुरु आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली. यावर किशोर पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.