गारगोटी / प्रतिनिधी
कोनवडे (ता.भुदरगड) येथील उपसरपंचपदी सुभाष पाटील यांची निवड झाली. सुकाणु कमीटीच्या नियमानुसार प्रा एच आर पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. निवडीच्या अध्यक्ष स्थानी सरपंच राणी पाटील होत्या. यावेळी सुभाष पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर शाल फेटा व पुष्पाहार देऊन ग्रामपंचायत मार्फत सत्कार करण्यात आला .
निवडीनंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. निवडीप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य , तसेच आर एस पाटील , माजी सरपंच ए व्ही पाटील , माजी सरपंच पांडूरंग पाटील , शिवाजी साताप्पा पाटील , आनंदा कळमकर, विलास पाटील , टी डी पाटील , संतोष पाटील , दिपक लोकरे , लक्ष्मण पाटील आदी उपास्थित होते .