वार्ताहर / यड्राव
कोरोची (ता.हातकणंगले) विवेकानंदनगर येथील मुलगा दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करित असल्याप्रकरणी रागाच्या भरात आईने खलबत्याचा दगड डोक्यात घालून खून केला. रविशंकर तेलसिंगे वय 38 असे त्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी आई लक्ष्मी शंकर तेलसिंगे वय 55 हिला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रात्री सोमवार(1) रोजी घडली. मूळचे सदलगा (कर्नाटक) येथील तेलसिंगे कुटुंब हे सहा वर्षांपासून शहापूर व कोरोची या परिसरात वास्तव्यास आहेत. कोरोची या परिसरात भगवान मारुती जाधव यांच्या खोलीत भाड्याने राहण्यास आहेत.रविचे लग्न झाले असून, काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी ही झाली आहे. तो यंत्रमागावर कामाला होता. तर त्याची आई ही घरी शिलाई मशीनवर गारमेंटची कामे करत आहे. सतत दारू पिऊन आई-वडीलांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता.
दरम्यान वारंवार होत असलेल्या या त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री आईने घरातील खलबत्त्यात असलेला दगड त्याच्या डोक्यात घातला. यावेळी तेथील नागरिकांनी पाहिले असता त्याच्या हातातील दगड काढून घेत शंकरला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला प्राथमिक उपचार करून कोल्हापूर सीपीआर नेले असता मात्र पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.