- मृतांचा आकडा 51 हजार 788 वर
ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच महाराष्ट्रात मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात मागील 24 तासात 6,971 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 35 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 00 हजार 884 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 788 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 2,417 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 94 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 52 हजार 956 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबईत 921 नवीन रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 540 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,19,128 वर पोहचली आहे. तर 2,99,546 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,442 इतकी आहे. सद्य स्थितीत 7 हजार 276 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.