ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
जगभरात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. लसीकरण हे कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावशाली शस्त्र असले तरी कोरोनाचा शेवट दूर आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसिस यांनी म्हटले आहे.
टेड्रोस घेब्रेयेसिस म्हणाले, जगभरात 78 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी केवळ लस हा उपाय नाही. कोरोनाचा शेवट अजून दूर आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीत कमी झालेली रुग्णसंख्या मागील सात आठवड्यात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच कोरोनाचे निर्बंध कडक करून कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.