ऑनलाईन टीम / तरुण भारत
माहिती आणि तंत्रज्ञान सक्षमीकरणासाठी संपुर्ण जगात महत्त्वपुर्ण कामगिरी बजावणारी कंपनी म्हणुन मायक्रोसॉफ्टचा दबदबा आहे. याच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट येईल असा इशारा दिला आहे. गेट्स यांनी एका मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, संसर्गामुळे ही महामारी येईल पण कोरोनाशी या महामारीचा काही ही संबंध असणार नाही असंही भाकित त्यांनी यावेळी केले आहे.
तसेच कोरोना महामारीवर बोलताना लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने कोरोनापासून होणाऱ्या गंभीर संसर्गाचा धोका कमी झाला असल्याचंही ते म्हणाले. गेट्स हे आपल्या ‘Gates Notes’ ब्लॉगमध्ये ते नेहमीच हवामानातील बदल आणि जागितक आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा करत असतात.
मात्र पुढील महामारी बोलताना ते म्हणाले कि, ही महामारी कोरोनापेक्षा वेगळी असेल, “गंभीर आजारांचा धोका आणि तोदेखील खासकरुन वृद्ध, जाड आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी आता संसर्गाच्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे,” असं बिल गेट्स म्हणाले आहेत.