ऑनलाईन टीम / लखनऊ :
हिंदी पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने उत्तरप्रदेशात योगी सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना योगी सरकार 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार माहिती विभागाने राज्यातील अशा पत्रकारांची माहिती यापूर्वीच गोळा केली आहे.
कोरोना काळात अनेक पत्रकारांना कव्हरेजदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला आणि उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन सरकारने मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी योगी सरकारने कोरोनामुळे निराधार झालेल्या मुलांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. अशा मुलांची काळजी घेणाऱ्यांना सरकार दरमहा चार हजार रुपये देईल. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या या मुलांना लॅपटॉप आणि टॅबलेट दिले जाणार आहेत.