प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. शुक्रवारी 310 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुक्त झालेल्या 789 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. एकूण बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्या अधिक आहे.
310 रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 101 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 17 व शहर आणि उपनगरांतील 84 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 11 हजार 500 च्या वर पोहोचली असून आतापर्यंत 7 हजार 475 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
73 हजार 584 अहवाल निगेटिव्ह
सध्या 3 हजार 805 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. आणखी 3 हजार 24 हून अधिक स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 25 हजार 618 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 89 हजार 15 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 73 हजार 584 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी बेळगाव, बैलहोंगल, कंग्राळी बी.के., बीडी (ता. खानापूर), केदनूर (ता. बेळगाव), संकेश्वर येथील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील चौघा जणांचा समावेश आहे. बाधित व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. गुरुवारी 300 जणांना कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारीही 300 आकडा कायम राहिला.
होनगा, मुतगा, सांबरा, हुलीकट्टी, भुतरामहट्टी, कंग्राळी बी.के., पंतबाळेकुंद्री, हालगा, हिंडलगा, मंडोळी, कंग्राळी खुर्द, काकती, जयनगर, शहापूर, सह्याद्रीनगर, गुड्सशेड रोड, महांतेशनगर, श्रीनगर, सुभाषनगर, राणी चन्नम्मानगर, कणबर्गी, विद्यानगर, रामतीर्थनगर, खासबाग, विनायकनगर, अनगोळ, कॅम्प, खासबाग परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
आळवाण गल्ली-शहापूर, अंजनेयनगर, अजमनगर, माळमारुती, टि. व्ही. सेंटर, भाग्यनगर, बसव कॉलनी, गांधीनगर, वड्डरवाडी, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, ब्रम्हनगर, टिळकवाडी, उप्पार गल्ली-खासबाग परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत. या बरोबरच अथणी, चिकोडी, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती, कागवाड, बैलहोंगल, कोथळी, कुडची, निपाणी, रामदुर्ग, एकसंबा, गोकाक, अरभावी आदी बेळगाव जिल्हय़ातील वेगवेगळय़ा तालुक्मयात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
उपचार करणाऱया डॉक्टरांना बाधा
सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये रुग्णसेवा करणाऱया व सुरुवातीपासून परिस्थिती हाताळण्यात उत्तम योगदान देणाऱया दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांसह एकूण चार डॉक्टरांना बाधा झाली आहे. जिल्हा सशस्त्रदलातील आठ जवान, पोलीस कंट्रोल रुम व आयुक्त कार्यालयातील प्रत्येकी एक पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. राज्य राखीव दलाच्या मच्छे येथील एक जवान व पोलीस क्वॉर्टर्समधील चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी एकूण 15 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.