82 टक्क्यांपर्यंत ड्रॉपलेट्स करतो सॅनिटाइज : अमेरिकेच्या नॉर्थ-वेस्टर्न विद्यापीठात निर्मिती
अँटीवायरल लेयर (आवरण) असलेला विशेष मास्क अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी तयार केली आहे. हा मास्क कोरोना विषाणूला निष्प्रभ करतो आणि संक्रमणाचा धोका कमी करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. अँटीवायरल लेयरयुक्त मास्क तयार करणाऱया अमेरिकेच्या नॉर्थ-वेस्टर्न युनिवर्सिटीनुसार प्रयोगशाळेत श्वसन, खोकला आणि शिंकताना नॉन-वोवेन प्रॅब्रिक वापरण्यासाठी सर्वात उत्तम कापड असल्याचे आढळून आले आहे.
निर्मितीचे स्वरुप
वैज्ञानिकांनी मास्क तयार करण्यासाठी नॉन-वोवेन प्रॅब्रिकचा वापर केला आहे. यावर श्वास बाहेर सोडताना ड्रॉपलेट्स सॅनिटाइज करणाऱया रसायनाचे आवरण देण्यात आले आहे. यामुळे संक्रामक रेस्पिरेट्री ड्रॉपलेट्स बाहेर हवेत फैलावत नाहीत. मास्कवर लेयर चढविण्यासाठी फॉस्फोरिक ऍसिड आणि कॉपर सॉल्टचा वापर करण्यात आला आहे.
मास्कमध्ये प्रभावी रसायन
वैज्ञानिकांनुसार या रसायनांना अँटीवायरल म्हणून ओळखले जाते. ही रसयाने नॉन-वोलाटाइल असल्याने उडत (बाष्पीभवन) नाहीत. विषाणू अत्यंत सुक्ष्म आणि नाजूक आहे. यावर कुठूनही प्रतिकूल प्रभाव पडल्यास तो स्वतःची संक्रमित करण्याची क्षमता गमावू शकतो, असे संशोधक जियाजिंग हुआंग यांनी म्हटले आहे.
ड्रॉपलेट्सचे सॅनिटाइज
अँटीवायरल लेयरयुक्त मास्क रेस्पिरेट्री ड्रॉपलेट्सना 82 टक्क्यांपर्यंत सॅनिटाइज करतो. नॉन-वोवेन प्रॅबिकने तयार मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही, असे मॅटर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात नमूद करण्यात आले आहे. महामारीशी लढण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क सर्वात आवश्यक हिस्सा असल्याचे संशोधक हुआंग यांनी म्हटले आहे.
मास्क केवळ वापरणाऱयाला सुरक्षित ठेवत नाही, तर इतरांना ड्रॉपलेट्सपासून होणाऱया संक्रमणापासूनही वाचविण्याचे काम करतो. नवा अँटीवायरल लेयर मास्क तोंडातून बाहेर पडणाऱया ड्रॉपलेट्सना रोखतो. जर हे ड्रॉपलेट्स मास्कमधून बाहेर पडले असते तर पृष्ठभागावर राहून इतरांना संक्रमित करण्याचे काम करू शकले असते असे हुआंग यांनी म्हटले आहे.