ऑनलाईन टीम / बिकानेर :
कोरोनाला रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री आणि राजस्थानमधील बिकानेरचे खासदार आणि अर्जुन राम मेघवाल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मेघवाल यांनीच ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
मेघवाल यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्यांनी कोरोना चाचणी केली. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, दुसऱ्यांचा चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. माझी प्रकृती आता ठिक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, आपले आरोग्य सांभाळावे, असे मेघवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला मेघवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यावरून ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.