ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना प्रत्येकी 50 लाखांचे विमा कवच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरोधी लढ्यात आपला जीव धोक्यात घालून सहभागी झालेल्या प्रत्येकांना 50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेश सरकारनेही कोरोनाविरोधात लढा देणाऱ्यांना केंद्र सरकार व्यतिरिक्त राज्याचे स्वतंत्र 50 लाखांचे विमा कवच जाहीर केले आहे.
हे विमा कवच कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि महसूल व ग्रामविकास विभागाचे कर्मचारी यांना लागू होणार आहे.