ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोना उगमस्रोताच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) पथक आज वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये दाखल झाले आहे.
वुहानमध्ये डिसेंबर 2019 च्या अखेरीस पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर काहीच दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पहायला मिळाला. त्यामुळे वुहानची प्रयोगशाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोनाचा उगम वुहानमधून नेमका कसा झाला, याची चौकशी WHO चे पथक करत आहे.
WHO च्या चौकशी पथकातील सदस्य पीटर डेसजाक म्हणाले, आम्ही वुहानमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. घाऊक बाजारात गेल्यानंतर वुहान मासळी बाजाराची पाहणी केली. अन्य ठिकाणांची अजून पाहणी बाकी आहे.