ग्लेनमार्क, सिप्लासह अन्य कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात देशातील औषधांची विक्री जोरदार राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही कंपन्यांनी कोविड19 च्या आजारावरील औषध बाजारात दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सप्टेंबर महिना हा औषध कंपन्यांसाठी फायद्याचा ठरल्याचे म्हटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4.7 टक्क्मयांनी औषध विक्री वाढली आहे. ऑगस्टमध्ये औषध कंपन्यांच्या विक्रीत दोन टक्क्मयांची घसरण राहिल्याची नोंद केली आहे.
मागील वर्षातील सप्टेंबरच्या तुलनेत औषध बाजारात 3.8 टक्क्मयांची तेजी आली असून हा क्षण मागील 36 महिन्यानंतर आल्याचे म्हटले आहे. मागील महिन्यात कोविड19 वरील औषधाचे सादरीकरण बाजारात करण्यात आले आहे. यामध्ये काही कंपन्यांची औषधाची किमत कमी तर काहींची अधिक असल्याची माहिती आहे.
विक्रीत उसळी नेंदवणाऱया कंपन्या
सप्टेंबर महिन्यात ग्लेनमार्कच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 37 टक्क्मयांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीने कोरोनावरील काही औषधे बाजारात दाखल केली आहेत. सिप्लानेही कोरोनावरील औषध सादर केले असून त्यांच्या विक्रीचा प्रभाव राहणार असल्याचे संकेत आहेत. विक्री सप्टेंबरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्मयांनी अधिक राहिली असल्याची नोंद आहे.