प्रतिनिधी / पणजी
आर्थिक विकास महामंडळाने कोविड-19 महामारीच्या निर्मूलनार्थ गोवा सरकारने जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सहकार्य करण्यासाठी रु. 1 कोटीची आर्थिक मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिली आहे.
ईडीसीचे चेअमन सदानंद तानावडे यांनी ईडीसीचा 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या हाती सुपूर्द केला. ईडीसीने हा निधी सीएसआर अंतर्गत गोवा सरकारला सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी सदानंद तानावडे व ईडीसी व्यवस्थापनाचे आभार मानले.