वार्ताहर/ पुसेसावळी
राज्यात कोरोना विषाणू परिस्थिती वर लॉक डाऊन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या अनुषंगाने अनेक गावे वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवत आहेत
सातारा जिह्यातील खटाव तालुक्यातील”चोराडे”हे सुमारे 3 हजार लोकसंख्या तर सरपंचासह एकूण 9 ग्रामपंचायत सदस्य असलेलं सातारा-सांगली जिह्याच्या सीमेवरील गाव.
कोरोना पार्श्वभूमीवर या गावात चक्क माजी सैनिक मिल्ट्री तील पोशाख परिधान करून गावातील चेक पोस्टवर तैनात आहेत.
खटाव तालुक्यातील चोराडे गावात येणारे प्रमुख रस्ते मागील आठवडयापासून पूर्णपणे बंद केले असुन गावातील एका ठिकाणच्या रस्त्यांवर चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे, या चेक पोस्टवर चोराडे गावातील दोन माजी सैनिक आपला मिट्रीतील पोशाख परिधान करुन कोरोंना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत.याचं कारण चोराडे गावामध्ये आसपासच्या पाच ते सहा गावांचा संबंध येतो,त्यामुळे याठिकाणी किराणा दुकानात, बँकेत, दवाखाना ,अशा अनेक कामानिमित्ताने बाहेर गावच्या नागरिकांची वर्दळ असते, लॉकडाऊनच्या काळात विविध कारणे देऊन गावात ये-जा करणायांच्या संख्येत वाढ झाल्याने गावामध्ये हे चेक पोस्ट उभे करण्यात आले आहे.
चोराडे येथील माजी सैनिक अभिजित पिसाळ व सचिन पिसाळ हे या चेक पोस्टवर येणार्या जाणार्या लोकांची चौकशी करून गावामध्ये प्रवेश देत आहेत. तसेच गावामध्ये विनाकारण गर्दी करु नका मास्कचा वापर करा अशा सुचनाही देत आहेत.परंतु अनेकदा सांगुन ही काही मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्यात येत असुन तो पावती रुपाने वसुल केला जात आहे.
त्यामुळे त्यांच्या चेक पोस्टवर विनाकारण फिरणायांनी मोठा धसका घेतला आहे.
आजपर्यंत देशसेवा केलेल्या या सैनिकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतलेला निर्णय इतर गावानीही घेण्याची गरज आहे.परिसरातील ग्रामस्थ व शासकिय स्तरातील अधिकारी वर्गातुन या माजी सैनिकांचे कौतुक होत आहे.