बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी ४ हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासनचीही चिंता वाढत आहे. दिवसागणिक बेंगळूरमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात ४,२२६ कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे बुधवारी शहरी जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७,१४५ वर गेली. बुधवारी २,३७३ कोरोना रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. तर बुधवारी कोरोनाने २४ रुग्णांचा बळी घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २ ९३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान बुधवारी राज्यात ८,८५६ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ८,८९० रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात ८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.