ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात चढ – उतार होताना दिसत आहे. मागील 24 तासात 8 हजार 418 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 10 हजार 548 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 171 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 %
राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 72 हजार 268 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के एवढा आहे.
- 6.38 लाख व्यक्ती होम क्वारंटाईन
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,03,60,931 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 07 हजार 431 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 832 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4,447 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यामध्ये
राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 14 हजार 297 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यात हा आकडा 16 हजार 670 इतका आहे. तर, ठाण्याच्या खालोखाल पुण्यात एकूण 16 हजार 524 इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या 12,988 इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या 12 हजार 240 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 319 इतकी आहे.