आणखी सातजणांना डिस्चार्ज : कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 74
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात बुधवारी आणखी सातजणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत एकूण 270 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारी आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सद्यस्थितीत जिल्हय़ात 74 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात कोव्हिड-19 लॅब झाल्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 5 हजार 695 नमुने तपासण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिली.
जिल्हय़ात बुधवारी आढळलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सावंतवाडी तालुक्मयातील कारिवडे येथील तीन आणि कुडाळ तालुक्मयातील झाराप येथील एकाचा समावेश आहे.
जिल्हय़ात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असले, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून त्यामध्ये राज्यात दुसऱया क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बुधवारी आणखी सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बाधित 350 रुग्णांपैकी 270 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 74 रुग्ण आहेत.
जिल्हय़ात कोविड लॅब होण्यापूर्वी कोरोना नमुना तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवावे लागत होते. त्यामुळे तपासणीला उशीर होत होता. मात्र कोविड लॅब जिल्हय़ात झाल्यापासून कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. आतापर्यंत 5 हजार 695 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 5 हजार 349 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 350 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कलमठ, नांदगाव तिठा येथे कंटेनमेंट झोन
कणकवली शहर बाजारपेठेतील दोन घरांचा समावेश असणारा 50 मीटरचा परिसर तसेच कलमठ-बिडयेवाडी येथील साईकृपा अपार्टमेंट व 50 मीटरचा परिसर आणि नांदगाव तिठा येथील 92 घरे, 103 कुटुंबे आणि 478 लोकसंख्या असणारा 100 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कणकवली बाजारपेठ येथील कंटेनमेंट झोनमध्ये 10 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादींना लागू असणार नाहीत. असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 5860
अहवाल प्राप्त झालेले नमुने 5695
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 350
निगेटिव्ह आलेले नमुने 5349
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 168
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 74
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 270
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 120
बुधवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4244
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16633
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 53
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13204
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3376
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 156625
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 37