रविवारी 27 जणांना कोरोना, 224 जणांचे अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. रविवारी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून गेल्या 24 तासांत 224 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव शहर व उपनगरांमधील 10 जणांचा समावेश आहे.
गणेशपूर, मच्छे, भाग्यनगर, बसापूर, आनंदनगर-वडगाव, शिवबसवनगर, कलमेश्वरनगर, हिंडाल्को परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. खानापूर येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रायबाग तालुक्मयातील बुवाची सौंदत्ती येथे रविवारी आणखी रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन बेळगावसह सीमेवर खबरदारी घेण्यात येत आहे. विवाह, अंत्ययात्रा यासाठी आरोग्य विभागाने नवी नियमावली जाहीर केली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27,062 वर पोहोचली आहे. यापैकी 26,607 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी 113 रुग्णांवर सिव्हिलसह विविध इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत होते. गेल्या 24 तासांत 224 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 411 जणांचे अहवाल यायचे आहेत. रुग्णसंख्या लक्षात घेऊन बेळगावला रोज किमान 2 हजारचे स्वॅब तपासणी उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमध्ये कोरोनाबाबत बैठक होणार असून यावेळी आणखी नियम काटेकोर करण्याची शक्मयता आहे.