ऑनलाईन टीम / वुहान :
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठय़ा फैलावत आहे. अशा कठीण स्थितीतही चीनमधील हजारो डॉक्टर,
परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राण संकटात घालून काम करत आहेत. वुहान येथील एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया एका डॉक्टरचा आज मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या वुचांग रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर ली झिमिंग यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे.
मृत्यू झालेले डॉक्टर हे रुग्णालयाचे संचालक होते. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झालेले ली हे पहिलेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. मागील आठवडय़ात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत सहा आरोग्य विभागातील कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणे, रुग्णांचा शोध घेणे, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आदी कामे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना करावी लागत आहेत.