केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणीच्यावेळी आधारकार्ड देणे बंधनकारक नसल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारने ही माहिती दिली. लसीकरणावेळी काही लसीकरण केंद्रांवर आधार कार्डसाठी दबाव आणला जात असल्याचे सांगण्यात आले होते. याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले होते.