दररोज सुरु आहे आरोग्य विभागाचे प्रशिक्षण
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनावरील लसी कधीही येवू शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. त्याचीच राज्यातील तीन जिह्यात रंगीत तालिमही पार पडली. विशेष म्हणजे ही रंगीत तालिम सातारा जिह्यात कधी होणार याचीच चर्चा सुरु आज दिवसभर होती. मात्र, कोरोनाची लस नेमकी कधी सुरु होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी दररोज प्रशिक्षण सुरु आहे. जिह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे.
सातारा जिह्यातून कोरोनाला कायमचाच बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा दररोज मेहनत घेत आहे. कोरोनाचे समुळ उच्चाटन करुन जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशिक्षणे दररोज सुरु असून नियोजने, आराखडे तयार आहेत. कोरोनाची लस आल्याच तिची साठवण करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज तयार करण्यात आलेले आहेत. सगळी यंत्रणा सज्ज आहे. लसी आली की त्याचे नियोजन केले गेले आहे. सुरुवातीला कोणाला लस द्यायची याचाही डाटा संकलित करण्यात आला आहे. आज राज्यातील तीन जिह्यात कोरोना लसीची रंगीत तालिम पार पडली. तशीच रंगीत तालिम सातारा जिह्यात कधी होणार?, प्रत्यक्ष पहिली लस देण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे. हे सगळे सध्या गोपनिय आहे. परंतु सातारा जिह्यातील आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकाऱयांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सतर्क आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून ज्या ज्या इन्स्ट्रक्शनस येत आहेत त्या त्या फालो केल्या जात आहेत. त्यामुळे लवकरच सातारा जिह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढाई सुरु आहे. या लढाईत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह सर्वच यंत्रणा तत्पर आहे.