ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावरील लस, ऑक्सिजन आणि इतर आजारांसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतर यासंदर्भात घोषणा झाली.
कोरोना लस आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये ऑक्सिजन, जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ करण्यात आले आहे. या उपकरणांच्या आयातीवर शुल्क माफ केल्याने याची उपलब्धता वाढून, ते स्वस्तात मिळतील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.