वॉशिंग्टन
कोलंबियातील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी गोळीबार झाला. या गोळीबारात 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांकडून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांकडेही बंदुका सापडल्या असल्या तरी त्यापैकी एकानेच गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबार करणाऱया व्यक्तीची अधिक चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामे करण्यात आले होते. मात्र, अन्य हल्लेखोर सापडले नाहीत.