प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरच्या पालकांनी मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळे आज ही मुले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहेत. कोल्हापूरचे खेळाडू कष्टाळू आहेत. रग्बी खेळ एन.आय.एस मध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये कोल्हापूर खूप अग्रस्थानी आहेत. खेळ खेळताना कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश तुमच्या हातात येईल. असे प्रतिपादन अभिनेता, भारतीय रग्बी असोसिएशनचे संचालक राहुल बोस यांनी केले.ते न्यू कॉलेज कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन व न्यू कॉलेज यांच्या वतीने आयोजीत आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू, पालक व रग्बी असोसिएशनच्या पदाधिकाऱयाशी संवाद कार्यक्रमात केले.
बोस पुढे म्हणाले, मी कोल्हापूरला दरवर्षी गणपती किंवा दिवाळीला येतो. माझी आई कोल्हापूरची आहे. त्यामुळे मला कोल्हापूर विषयी विशेष प्रेम आहे. भविष्यात देखील कोल्हापूरच्या मुलांच्या बरोबर रग्बी खेळ खेळण्यासाठी येणार आहे यावेळी बोस यांनी अल्पावधीत खूप मोठी चांगली कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे कौतुक केले. बाजार भोगाव येथे रग्बी या खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण होत आहे ही विशेष बाब असल्याचे त्यांनी नमूद करत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने कोल्हापूरचा रग्बी असोसिएशनचा अहवाल पी.पी.टी मार्फत सादर केला. तसेच कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या झेंडÎाचे उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, नरेंद्र खाडे, राहुल लहाने, अविनाश खडके, राम पाटील, सुशांत मगदूम, विजय मळगे, दत्ता भोपळे, वीरभद्र कावडे, जगन्नाथ पोतदार, बळीराम पाटील यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व पालक मो्या संख्येने उपस्थित होते.