वार्ताहर / पुलाची शिरोली
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. गजानन लक्ष्मण उनाळे (वय ४०, रा. शिवाजी नगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या साई मोटार शोरुमसमोरील सेवा मार्गावर (२४ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गजानन उनाळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करतात. सद्या त्यांची चार ते अकरा अशी ड्युटी सुरू होती. रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर ते चालतच घरी निघाले होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या साई मोटार शोरुमसमोरील सेवा मार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत गजानन उनाळे हे जागीच ठार झाले. त्यांचा पुतण्या स्वरुप उनाळे यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली.