अज्ञाताने गळा चिरुन केले होते गंभीर जखमी
गेल्या आठवड्यातील लायकर मळ्यातील घटना
अज्ञाताविरोधी खूनाचा गुन्हा नोंद
प्रतिनिधी / इचलकरंजी
गेल्या आठवड्यात शहरातील लायकर मळ्यात उत्तम राजाराम चौगुले (वय ४६, रा. तिळवणी, ता. हातकणगंले) या युवकावर अज्ञाताने खूनी हल्ला करुन, गंभीर जखमी केले होते. त्याला सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना शनिवारी (७ नोव्हेंबर) दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञाताविरोधी खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जखमी उत्तम चौगुले हा युवक इचलकरंजीतील संजय लायकर यांच्या मालकीच्या लायकर मळ्यामधील जनावरच्या गोव्याची निगा राखण्याचे काम करीत होता. तो गुरुवारी (२९ ऑक्टोंबर) रात्री जनावरांना चारा घालुन गोठ्यामध्ये झोपला. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने सशस्त्र हल्ला करुन त्यांचा गळा चिरुन गंभीर जखमी केले. त्यानंतर हल्लेखोरांने घटनास्थळावरुन पलायन केले आहे. या हल्याची माहिती समजताच गोटा मालक लायकर यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीस त्वरीत सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण त्यांची प्रकृती गंभीर बनत चालली होती. अखेर शनिवारी (७ नोव्हेंबर) दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.