‘दै. तरुण भारत’मुळे सार्वजनिक बांधकामाची तत्परता
प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे तालुका करवीर येथे नवीन रोडवरती अपघाती एल आकाराचे वळण आहे. या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. भविष्यामध्ये असे अपघात होऊ नये म्हणून ‘दै. तरुण भारत’ तर्फे १८ सप्टेंबर रोजी शेतामध्ये गाडी गेल्याने तात्काळ भेट देऊन दिशादर्शक फलक व बॅरिकेट्स लावण्याची मागणी माजी पंचायत सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी फोनद्वारे मागणी केली होती.
त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तत्परतेने या वळणाच्या दोन्ही बाजूस दिशादर्शक फलक, जवळपास ५० फूट कॅरी डोअर, अपघाती वळण अशा पद्धतीचे फलक लावल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचेकडून तात्काळ कामाबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.